चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे आभार मानले. तसेच संपूर्ण देशभरात उत्सव साजरा करण्यात आला होता. भारताचे मून लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.
पंतप्रध मोदी यांच्या घोषणेनंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं अशी मागणी केली. स्वामी चक्रपाणी यांच्या या मागणीवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्यानं दुसरीकडे ट्वीट शेअर करुन अभिनेते प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश राज यांनी एका न्यूज आर्टिकलची लिंक शेअर केली आहे. ज्यामध्ये चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं अशी मागणी स्वामी चक्रपाणी यांनी केली आहे, असं लिहिलेलं दिसत आहे. ही लिंक शेअर करुन प्रकाश राज यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘ओके तुमचा प्रवास सुखकर होवो! चांद्रयानच्या लँडिंगनंतर चंद्राला “हिंदु राष्ट्र” घोषित करावे अशी स्वामींची इच्छा आहे.’ प्रकाश राज यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
प्रकाश राज हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी चांद्रयान-3 मिशनबाबत ट्वीट केल्याबद्दल अभिनेता प्रकाश राज यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे प्रकाश राज यांच्या अडचणी वाढल्या होत्या.
“उद्धवजी तुमची मशाल तुमच्या स्वत:च्याच घराला भस्मसात करणारी”