केंद्राच्या विविध सात पायाभूत प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे नियंत्रक आणि महालेखापाल अर्थात कॅग यांनी उघड केले आहे. त्यापैकी दिल्लीच्या द्वारका द्रुतगती महामार्गाचा निर्मितीखर्च प्रतिकिलोमीटर १८ कोटींवरून २५० कोटींपर्यंत वाढल्याचे उघड झाले.कॅगचा आरोप केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने फेटाळला. यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करताना मोठा दावा केला आहे.
कॅगच्या अहवालाद्वारे नितीन गडकरींना अडकवण्याचा कट रचला जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांबाबत संजय राऊत यांना माध्यमांमध्ये प्रश्न विचारण्यात आला. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, माझ्याकडे त्याबाबत माहिती नाही. पण नितीन गडकरी हे देशातील महत्त्वाचे नेते आहेत. ते कार्यक्षम मंत्री आहेत. देशभरात त्यांनी केलेले कामच सध्या दिसत आहे. ते भविष्यामधील या देशाचे नेतृत्व आहेत. जे वाटेत आडवे जातात, त्यांना कसे संपवायचे? यासाठी अनेक यंत्रणा राबवल्या जातात, हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही त्याचे पीडित आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तर यावर विजय वड्डेटीवार यांनी भाष्य केले आहे ते म्हणाले की, कॅगचा रिपोर्ट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना कॅगने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. यातून हे स्पष्ट होत आहे. नितीन गडकरींविषयी सगळे सांगतात की, त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांची प्रतिमा विकासाची आणि स्वच्छ अशी झाली आहे. त्यामुळे त्यांना बाजूला करून त्यांचे राजकारण संपवायचे हेही एक कारण असू शकते, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता.
नितीन गडकरी भविष्यातील देशाचे नेतृत्व, पण जे आडवे जातात त्यांना… संजय राऊत यांच मोठं विधान
केंद्राच्या विविध सात पायाभूत प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे नियंत्रक आणि महालेखापाल अर्थात कॅग यांनी उघड केले आहे. त्यापैकी दिल्लीच्या द्वारका द्रुतगती महामार्गाचा निर्मितीखर्च प्रतिकिलोमीटर १८ कोटींवरून २५० कोटींपर्यंत वाढल्याचे उघड झाले.कॅगचा आरोप केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने फेटाळला. यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करताना मोठा दावा केला आहे.
कॅगच्या अहवालाद्वारे नितीन गडकरींना अडकवण्याचा कट रचला जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांबाबत संजय राऊत यांना माध्यमांमध्ये प्रश्न विचारण्यात आला. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, माझ्याकडे त्याबाबत माहिती नाही. पण नितीन गडकरी हे देशातील महत्त्वाचे नेते आहेत. ते कार्यक्षम मंत्री आहेत. देशभरात त्यांनी केलेले कामच सध्या दिसत आहे. ते भविष्यामधील या देशाचे नेतृत्व आहेत. जे वाटेत आडवे जातात, त्यांना कसे संपवायचे? यासाठी अनेक यंत्रणा राबवल्या जातात, हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही त्याचे पीडित आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तर यावर विजय वड्डेटीवार यांनी भाष्य केले आहे ते म्हणाले की, कॅगचा रिपोर्ट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना कॅगने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले.
यातून हे स्पष्ट होत आहे. नितीन गडकरींविषयी सगळे सांगतात की, त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांची प्रतिमा विकासाची आणि स्वच्छ अशी झाली आहे. त्यामुळे त्यांना बाजूला करून त्यांचे राजकारण संपवायचे हेही एक कारण असू शकते, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता.
आपल्याच विधानाने अडचणीत आलेल्या हसन मुश्रीफांनी दिलगिरी केली व्यक्त !
इरफान खान यांच्या नावावरून या मराठी अभिनेत्यानं ठेवलं मुलीचं नावं !