मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असला तरी अक्टीव रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात आज कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ७५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. काल २२४३ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९३ हजार १५४ झाली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख ९२ हजार ७२३ नमुन्यांपैकी १ लाख ८० हजार २९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.१६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार ३९६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात काल १९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १२९ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.४७ टक्के एवढा आहे.
मागील ४८ तासात झालेले ६९ मृत्यू हे मुंबई मनपा-६, ठाणे मनपा-५, कल्याण-डोंबिवली मनपा- १, भिवंडी निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर मनपा-३, वसई-विरार मनपा-१, धुळे मनपा-१, जळगाव-८, पुणे-४, पुणे मनपा-२३, पिंपरी चिंचवड मनपा-१, सोलापूर मनपा-३, सिंधुदूर्ग-१, जालना-३, लातूर-१,उस्मानाबाद-२, नांदेड मनपा-१, अकोला मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
काल राज्यात एकूण नोंदविलेल्या १९८ मृत्यूंपैकी ६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १२९ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६९, मीरा भाईंदर -२६, ठाणे मनपा -१७, कल्याण डोंबिवली -४, जळगाव – ३, पुणे -३,नवी मुंबई -१, उल्हास नगर -१, भिवंडी -१, पालघर -१, वसई विरार -१, धुळे -१ आणि अकोला-१ यांचा समावेश आहे. हे १२९ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.