Latest Marathi News

BREAKING NEWS

पत्रकार हल्ल्यासंबंधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0

पुणे : पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे सुरु असलेल्या राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीस रविवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी पत्रकार हल्ल्यासंबंधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक असून त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनाही या कायद्याबाबत माहिती देण्यात येईल अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पत्रकार समाजाचे प्रतिनिधित्व करताना राजकीय शक्तीवर अंकुश ठेवण्याचे काम करतात, असे पाटील यावेळी म्हणाले. तसेच समाजाला दिशा दाखविण्याचे आणि समाजाचे प्रश्न मांडण्याचे महत्वाचे काम माध्यमांद्वारे होत असल्याने पत्रकारांना आरोग्य, सुविधा व घरे देण्यासाठीही शासन प्रयत्नशील असल्याची माहीती पाटील यांनी या बैठकीत दिली.

यावेळी राज्य समितीचे अध्यक्ष यदुनाथ जोशी, माजी राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील, माहिती व जनसंपर्कचे संचालक हेमराज बागुल, किशोर गांगुर्डे, डॉ राहुल तिडके, विभागीय उपसंचालक व समितीचे सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.