Latest Marathi News

BREAKING NEWS

पुण्यातील या अनोख्या भाऊबीजेचे तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटीलांकडून कौतुक

0

पुणे : पुणे शहरातील सर्व पक्षीय महिला नेत्यांनी आज अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी केली. पुणे शहराला आगीसारख्या घटनांपासून सुरक्षित ठेवणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांचे औक्षण करून हा भाऊबीज सण साजरा करण्यात आला.

भोई प्रतिष्ठान पुणेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.

या वेळी पाटील यांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच सर्व माता भगिनींना दिवाळी आणि भाऊबीज सणाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.