Latest Marathi News

BREAKING NEWS

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला धावत्या लोकलमधून फेकून दिले

0

मुंबई : पत्नींच्या चारित्र्यावर संशय घेत खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकादरम्यान आपल्या पत्नीला मारहाण करत तिला चालत्या गाडीतून फेकून दिल्याची घटना नवी मुंबई येथे घडलेली आहे. सदर इसमाचे नाव विशाल मनोज माने असून त्याला पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. १७ सप्टेंबर रोजी विशाल-आरती दोघे पती-पत्नी पनवेल वरून मानखुर्द येथे येत असताना पती विशाल माने याने हे कृत्य केले आहे.

या घटनेतील आरोपी विशाल हा मानखुर्दच्या पुउलाखाली असलेल्या झोपडपट्टीत राहण्यास असून त्याचा विवाह मानखुर्द भागातच राहणाऱ्य आरती सरवदे हिच्यासोबत झाला होता. विशाल आरतीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत होते. १७ सप्टेंबरला विशाल व आरती हे दोघे पनवेल येथे नातेवाईकांकडे गेले होते.

त्यानंतर सायंकाळी ६. ३० वाजण्याच्या सुमारास मानखुर्द येथे परतण्यासाठी त्यांनी पनवेल येथून लोकल पकडली होती. या प्रवासादरम्यान विशालने आरतीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी लोकलमध्ये भांडण काढले. त्यानंतर त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीतच त्याने आरतीला खांदेश्वर आणि मानसरोवर स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून ढकलून दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.