Latest Marathi News

BREAKING NEWS

वैराग येथे अंबिका योगाश्रमाच्यावतीने नवदुर्गा पुरस्काराने सन्मान

0

वैराग :

कुटुंबाच्या जडणघडणीत महिलांचे कुटुंब आणि समाजातील स्थान महत्वाचे आहे . त्यामुळे त्यांचा सन्मान करणे आवश्यक असल्याने श्री अम्बिका योगाश्रम ठाणे ,वैराग शाखेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना नवदुर्गा पुरस्काने सन्मानित करण्यात आले .

अम्बिका योगाश्रम वैराग(ता बार्शी ) येथे डॉ . क्षितिजा बोधले यांच्या हस्ते पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुलभा मगर ,जास्मिन सय्यद , डॉ . सई गुंड , अरुणा रेळेकर , राणी आदमाने ,वंदना भालशंकर , दमयंती सुतार , अश्विनी उंडाळे ,वसुंधरा देशमुख या महिलांचा सन्मान करण्यात आला.
प्रास्तावीक – मोहिते ,सूत्रसंचालन जिवन बोधले यांनी केले तर आभार दतात्रय उंडाळे यांनी मानले, यावेळी अहमद बेग,धनंजय दळवी, शंकर धावारे ,महादेव करंडे, आप्पा धोकटे , किशोर परदेशी ,गणेश नकाते,गणेश आवारे, ताराबाई धावारे ,गौरी खेंदाड , बसवराज कोरशेट्टी , गणेश भाळवणे, आणि योगसाधक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.