Latest Marathi News

BREAKING NEWS

संत निरंकारी मिशन कोथरुड यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट

0

पुणे : संत निरंकारी मिशन कोथरुड यांच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या शिबिरास भेट दिली. अनेक रक्तदात्यांचा या शिबिराला उत्तम असा प्रतिसाद मिळाला.

संत निरंकारी मिशन कोथरुड यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. समाजाची गरज ओळखून निरंकारी मिशन कडून समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. पुण्यातही निरंकारी मिशनचे काम सुरु असल्याचा आनंद असल्याचे पाटील यांनी यावेळी म्हटले .

चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण शिबिराची पाहणी केली. आजच्या रक्तदान शिबिरात सहभागी सर्व रक्तदात्यांचे पाटील यांनी मनापासून आभार देखील मानले. तसेच संत निरंकारी मिशनचे देखील यासाठी अभिनदंन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.