Latest Marathi News

BREAKING NEWS

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित स्नेह मेळाव्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

0

पुणे , ०९ ऑक्टोबर : ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने आज स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्व ज्येष्ठांना शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित मेळाव्यास चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहत दीप प्रज्वलन केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीने मोफत प्रवास, महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढविली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी पुढे सांगितले कि, यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होत आहे. यासह ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकसहभागातून कोल्हापूर आणि पुण्यातही विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाही अनेकजण लाभ घेत आहेत, असे पाटील यांनी यावेळी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.