Latest Marathi News

BREAKING NEWS

गाय, गुरु, गीता, गंगा, गोविंदसाठी इस्कॉनच्या माध्यमातून सुरू असलेले काम अतिशय महत्वाचे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

0

पुणे, ०८ ऑक्टोबर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराज मठात जाऊन दर्शन घेतले. तसेच कोंढवा येथील इस्कॉन मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे देखील दर्शन घेतले.

चंद्रकांत पाटील यांनी आज धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराज मठात जाऊन महाराजांच्या चरणी लीन झाले. सर्वांना उत्तम आरोग्यासह सुख, समाधान लाभो अशी पाटील यांनी महाराजांच्या चरणी प्रार्थना केली.

त्यानंतर पाटील यांनी आज कोंढवा येथील इस्कॉन मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. यावेळी पंढरपूर येथे इस्कॉनच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भूवैकुण्ठाबद्दल ऐकून अतिशय आनंद झाला. गाय, गुरु, गीता, गंगा, गोविंदसाठी इस्कॉनच्या माध्यमातून सुरू असलेले काम अतिशय महत्वाचे आहे. या विधायक कार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.