अॅड. आंबेडकर यांना धक्का, अतिरिक्त मतांचा प्रश्न निकाली
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर सर्वच विरोधी पक्षांनी शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते. विशेष म्हणजे शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सायंकाळी ६ नंतर वाढलेल्या ७६ लाख मतदारांचा आकडा संशयास्पद असल्याचे म्हटले होते. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून २५ जून रोजी निकाल देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज अॅड. आंबेडकर यांची याचिका फेटाळली. तसेच न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याचे निरीक्षण नोंदवले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेकदा महाराष्ट्रातील निकालावर शंका उपस्थित केली होती तर दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागूपरमधील मतदारसंघातील मतांची आकडेवारी शेअर करत प्रश्न उपस्थित केला होता. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही काँग्रेसला आकडेवारीसह प्रत्युत्तर देण्यात आले. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने ७६ लाख मतदारांचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
याचिकाकर्त्यांनी
वेळ वाया घालवला
याचिकाकर्ते आणि आमचा कालच्या कामकाजाचा वेळ वाया घातला, असे निरीक्षणही हायकोर्टाने निर्णय देताना नोंदवले. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आता न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता अॅड. आंबेडकर गुरुवारी आपली भूमिका मांडणार आहेत.
BREAKING NEWS
- कौटुंबिक स्तरात शाश्वत आनंद, समृद्धी व आत्मिक समाधान कशात ?
- नागपूरमध्ये विधानभवनात अविनाश सोलवट यांची भेट
- कलियुगात प्रचिती दातृत्वाची.!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोंढवा बु. भागातील मुख्य रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
- कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- “आशा” योजनेच्या माध्यमातून ७०० हून अधिक रुग्णांवर मोफत जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या, चंद्रकांत दादा पाटील यांची अपोलो प्रतिनिधींशी भेट
- अपोलो हॉस्पिटलचे CEO तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट