घोडेस्वारीत अतुलनीय कौशल्य आणि सांघिक कार्य दाखवून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची मान उंचाविल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन – चंद्रकांत पाटील
पुणे : एशियन गेम्स स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी सुरु झाली आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आणि एका गोल्ड मेडलची कमाई केली आहे. भारताच्या घोडेस्वारी संघाने आज चमकदार कामगिरी केली. हांगझोऊ येथे सुरु असणाऱ्या आशियन गेम्स २०२३ या स्पर्धेत इक्वेस्ट्रीयन (घोडेस्वारी) या खेळात सुदीप्ति हजेला, दिव्यकीर्ति सिंह, अनुश अग्रवाल आणि हृदय छेडा या भारतीय घोडेस्वारांनी समर्पण आणि दृढनिश्चयाने इतिहास रचला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, भारताच्या क्रीडा क्षेत्रातील एक सुवर्ण क्षण! हांगझोऊ येथे सुरु असणाऱ्या आशियन गेम्स २०२३ या स्पर्धेत इक्वेस्ट्रीयन (घोडेस्वारी) या खेळात सुदीप्ति हजेला, दिव्यकीर्ति सिंह, अनुश अग्रवाल आणि हृदय छेडा या भारतीय घोडेस्वारांनी समर्पण आणि दृढनिश्चयाने इतिहास रचला आहे. अतुलनीय कौशल्य आणि सांघिक कार्य दाखवून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची मान उंचाविल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा, असे पाटील यांनी म्हटले.
भारताने 41 वर्षानंतर घोडस्वारीत गोल्ड मेडलची कमाई केली आहे. भारताने 1982 नंतर पहिल्यांदा घोडस्वारीत सुवर्ण पदक जिंकलं आहे. या प्रकारात भारताला गोल्ड मेडल अशी कोणतीच आशा नव्हती. पण भारतीय खेळाडूंनी गोल्ड मेडल कमाई करून दाखवली.