गणेशोत्सवासाठी पुण्यात येणाऱ्या भाविकांची गैरसोय टळावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली व्यवस्थेची माहिती
पुणे : पुण्यात सध्या गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुका तर पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी राहते. याच गर्दीत लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यवस्थेची माहिती दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, गणेशोत्सवासाठी पुण्यात येणाऱ्या भाविकांची गैरसोय टळावी यासाठी लोकसहभागातून २०० स्वच्छतागृहे, गरोदर महिलांना आरामासाठी आणि महिलांना तीन व्हॉनिटी व्हॅन स्वरुपात हिरकणी कक्ष याची सोय केली जाणार आहे.
यासोबतच चंद्रकांत पाटील म्हणाले कि, पोलीस तथा महापालिका कर्मचाऱ्यांना जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस आणि अनंत चतुर्दशीला ही व्यवस्था पुणे शहरातील गर्दीच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.