Latest Marathi News

BREAKING NEWS

हातात बंदूक घेऊन स्टाईल मारणाऱ्या बर्थडे बॉयला पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा

0

पुण्यात तलवारीने केक कापण्याचे अनेक प्रकार फोटो समोर आले होते अशातच आता छत्रपती संभाजीनगर शहरात हातात बंदूक घेतलेला फोटो बॅनरवर लावणे एका गल्लीतल्या भाईला चांगलेच महागात पडले आहे. माया भाई अशा आशयचे बॅनर सर्वत्र झळकल्यानंतर त्यांची शहरात चांगलीच चर्चा रंगली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे.

या बाबत समोर आलेली माहिती अशी की, माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये माया भाई नावाच्या एका व्यक्तीला वाढदिवसाचे शुभेच्छा देणारे बॅनर काल लागले होते. या बॅनरची शहरभर जोरदार चर्चा होती. कारण ज्या महाशयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्यासाठी बॅनरवर जो फोटो लावला आहे त्यात या महाशयांच्या हातात बंदूक होती.

त्यामुळे अशा प्रकारचे बॅनर लावून शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत होत्या. आता या बंदुकीच्या छायाचित्रासह शुभेच्छांची बॅनरबाजी करणे या भाईच्या चांगलीच अंगलट आली असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.

सदर प्रकरणात पोलिसांनी जवाहर नगर पोलिसांनी बॅनर काढून स्वयंघोषित भाऊ संतोष ज्ञानेश्वर थोरात आणि माया भाई उर्फ प्रशांत सासवडे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दोघांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू होती. विशेष म्हणजे या बॅनरवर शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचे छायाचित्रेही लावून “माया भाई वाढदिवसाच्या शुभेच्छा” असा मजकुर लिहिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.