Latest Marathi News

BREAKING NEWS

बार्शी नगरपालिकेला १० कोटी निधी मंजूर – आमदार राजेंद्र राऊत

0

बार्शी |

आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नामुळे बार्शी नगरपालिकेला विविध विकास कामे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रभाग क्र.१,२,३,१३, १५,१६,१७,२० मधील रस्ते डांबरीकरण,खडीकरण व आर सी सी गटार करणे यासाठी १० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

बार्शी शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आमदार राजाभाऊ राऊत नेहमी बार्शीकरांना नागरी सुविधा देण्याकरिता तत्पर व कटीबद्ध आहेत.

पाठीमागील पाच वर्षाच्या काळामध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शी शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे.त्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत गरजा तसेच विविध विकासकामे केली आहेत.बार्शी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता आमदार राजाभाऊ राऊत हे नेहमी बार्शीकर यांना नागरी सुविधा देण्याकरीता कटिबद्ध आहेत.

लवकरच या कामांची निविदा प्रसिद्ध होवून,त्या प्रक्रीये नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.