सांगली | मिरज शहरात दुकाने आणि हॉटेलचे बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले होते. या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंजद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. आता याप्रकरणी ब्रह्मानंद पडळकर यांना आणखी एक दणका बसला आहे. मिरज तालुका न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्या जागेबाबत निकाल दिला आहे. यात मिळतकदारांचा त्या जागेवर कब्जा न्याय दंडाधिकाऱ्यांनी मान्य केला आहे.
तसेच मिरज शहरात जेसीबीच्या सहाय्याने दुकाने आणि हॉटेलचं बांधकाम पाडण्यात आलं होतं.बेकायदेशीररित्या जमाव जमवून मालमत्तेचं नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यात बेकायदेशीरपणे लोकांच्या मालमत्तेत घुसणे, नुकसान करणे, लोकांना मारहाण करणे आणि नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी १२ कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता मिरज तालुका न्याय दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणी सुनावणी करताना ब्रह्मानंद पडळकर यांना दणका दिला आहे. संबंधित जागेवर मिळकतदारांचा कब्जा असून आता पडळकर यांनी योग्य त्या ठिकाणी दाद मागावी असंही न्यायालयाने म्हटलंय. मिरजेत रस्त्या शेजारी असलेली दोन हॉटेल्स, एक मेडिकल स्टोअर, ट्रॅव्हल ऑफिस, एक घर आणि पान शॉप पाडण्यात आले होते. त्यानंतर नागरिकांनी तक्रार दाखल केली होती.