आपल्या मातीतल्या मल्लखांब या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी, स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी नक्की या – चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे |
राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी पुणे सज्ज होतंय. या स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद लाभलाय. २८ आणि २९ तारखेला स्पर्धा आहे. आपल्या मातीतल्या या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी, स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी नक्की या, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
चंद्रकांत पाटील यांनी मल्लखांब स्पर्धेची माहिती देताना म्हटले कि, महाराष्ट्र राज्य हौशी मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीने गेल्या वर्षी जिल्हा स्तरीय मल्लखांब स्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळी जवळपास साडे चारशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ती स्पर्धा खूप गाजली. त्याच वेळेला असा संकल्प सोडला होता कि पुढच्या वर्षी आपणं राज्यस्तरीय स्पर्धा घेऊ. ती राज्यस्तरीय स्पर्धा २८ आणि २९ जानेवारी अशा दोन दिवस पुण्यात होणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
एव्हाना ८०० वेगवेगळ्या खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. वेगवेगळ्या संघांनी आपली नावे नोंदवली आहेत. या वर्षी हि स्पर्ध खूप गाजणार. पाच लाखांची रोख बक्षिसे या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली आहेत. मी खेळाडूंना आवाहन करत आहे कि, अजूनहि एंन्ट्री सुरु आहेत, त्यामुळे आपली नावे नोंदवा. क्रीडा रसिकांनाही आवाहन आहे कि, त्यांनी या स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून यावे. स्पर्धेच्या संयोजकांना खूप खूप शुभेच्छा चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.