Latest Marathi News

BREAKING NEWS

आता इथे होणार मोफत सिजेरीयन डिलिव्हरी. जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ

0

करमाळा : करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे सिजेरीयन शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला असून करमाळा तालुक्यातील मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना या माध्यमातून आम्ही मोफत ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून खाजगी दवाखान्यामध्ये सिजेरीयन डिलिव्हरीसाठी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येत असल्याने सर्वसामान्यांची मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होती.

आता ती गैरसोय दूर झाली असून करमाळा तालुक्यातील जनतेने या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे. उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे सिजेरीयन शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर 2 प्रसुत्या यशस्वीपणे झाल्यानंतर करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे हस्ते सौ. मनिषा शिंदे कंदर सौ. प्रिंयका अडागळे सावडी या माता व बाळांना शुभेच्छा देवुन भेटवस्तु म्हणून बेबी किट देण्यात आले.

या दोन्ही शस्त्रक्रिया भूलतज्ञ डॉक्टर सत्यनारायण गायकवाड रोग तज्ञ डॉक्टर नीलेश मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडल्या. मा .आ . जयवंतराव जगताप यांनी आ .संजयमामा शिंदे यांचे आभार मानून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल डुकरे, डॉ . राहुल कोळेकर, मुख्याधिकारी विणाताई पवार नगराध्यक्ष वैभवराजे जगताप नगरपालिका कर्मचारी सर्व नर्स व स्टाफ यांचे कौतुक केले . यावेळी मुख्याधिकारी वीणा पवार, चिखलठाणचे सरप़ंच चंद्रकांत सरडे, आदिनाथचे माजी संचालक तानाजी झोळ, प्रशांत ढाळे, कंदरचे सरपंच भास्कर भांगे, जयराज चिवटे, अॅड राहुल सावंत नवनाथ रांखुडे संतोष बलदोटा विठ्ठल क्षीरसागर पप्पु उकीरडे शंकर रासकर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.