Latest Marathi News

BREAKING NEWS

फाल्कन २००० जेटसची नागपुरात निर्मिती

0


पॅरिस : प्रतिनिधी
फ्रान्सच्या फाल्कन २००० जेट्सची निर्मिती आता नागपुरात होणार असून त्यासंबंधी डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्समध्ये करार करण्यात आला आहे. पॅरिस येथे आयोजित एअर शोदरम्यान, डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्यात हा ऐतिहासिक करार झाला. फ्रान्सच्या बाहेर अशा प्रकारची प्रथमच ही निर्मिती होणार आहे.

नागपूर, मिहानमध्ये होत असलेल्या या उत्पादनातून भारताच्या हवाई उत्पादन क्षेत्राला मोठा चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया धोरणालाही यामुळे मोठा बुस्ट मिळेल. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. नागपुरात संरक्षण उत्पादनाच्या दृष्टीने अनेक सुविधा निर्मितीचे काम आम्ही केले. त्यादृष्टीने हा एक माईलस्टोन करार आहे.


भारतासाठी आणि जागतिक बाजारपेठेसाठी फाल्कन २००० ची संपूर्णत: निर्मिती आता नागपुरात होणार आहे. या करारामुळे अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझील या देशांच्या पंक्तीत भारत गेला आहे. नागपुरातील डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (डीआरएएल) हे सेंटर ऑफ एक्सलन्स ठरेल. फाल्कन ८ एक्स आणि ६ एक्स ची असेम्ब्ली सुद्धा तेथेच होईल. यामुळे पहिले मेड इन इंडिया फाल्कन २०२८ पर्यंत नागपुरात तयार होईल.


डसॉल्ट एव्हिएशन प्रथमच फ्रान्सबाहेर, भारतीय आणि जागतिक बाजारपेठांसाठी फाल्कन २००० जेट्सची निर्मिती करणार आहे. या ऐतिहासिक उत्पादनासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्ट्रक्चर भागीदार आहेत. कॉर्पोरेट आणि लष्करी वापरासाठी २०२८ पर्यंत पहिली डिलिव्हरी करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर पुढील पिढीतील बिझनेस जेट्स वितरित करण्यात महाराष्ट्र अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझीलच्या यादीत सामील झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.