Latest Marathi News

BREAKING NEWS

‘एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही?’; शरद पवारांनी गृहमंत्र्यांना झापलं

0

 

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत असून सुरक्षितेच्या कारणास्तव नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. “माझ्यासोबत केवळ ३५ नाही, तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी १० आमदार सोबत येणार आहेत”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

गुजरातच्या सूरतहून हे सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटीला रवाना झाले आहेत. आमदारांसोबत कोणताही संपर्क राहू नये यासाठी त्यांना गुवाहटीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आसाममध्ये दाखल होताच एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपल्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० आमदार असल्याचा दावा केला. बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यांच्या मार्गावरच आमची वाटचाल राहील, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत सिल्वर ओकवर बैठक झाली. या बैठकीत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही?, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित करत गृहखात्यावर नाराजी व्यक्त करत या प्रकरणी चांगलेच झापले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.