Latest Marathi News

BREAKING NEWS

आम आदमी पार्टी सोलापूर मध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश…!

0

सोलापूर |

आम आदमी पार्टी संपूर्ण देशामध्ये वाढत आहे. आणि गुजरात निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी पूर्ण ताकतीने प्रचार करीत आहे. त्यातच आता महाराष्ट्रामधेही पार्टी संघटन वाढवण्यावर काम करीत आहे. याच पाश्वभूमीवर आता सोलापूर मधेही पार्टी संघटन वाढवण्यावर भर देत आहे. दिनांक 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या आम आदमी शेतकरी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पक्ष प्रवेश आणि प्रभाग 20 चे इच्छुक उमेदवार जुबेर हिरापुरे यांच्या शाखा उदघाट्न कार्यक्रम पार पडला तसेच अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.

यावेळी आम आदमी शेतकरी संघटनेचे राज्य संघटक बाबासाहेब चव्हाण, युवा नेते निलेश संगेपाग, जिल्हाअध्यक्ष एम पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष खतीब वकील, आम आदमी शेतकरी संघटना जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश शिंदे, जिल्हा सचिव रुद्राप्पा बिराजदार, जिल्हा संघटक आनंद जाधव, जिल्हा उपाध्यक्ष चांदणे, शहर अध्यक्ष अस्लम शेख, अशपाक बागवान, सचिन व्हनमाने, रॉबर्ट गुंड, मल्लिकार्जुन पिलगेरी, प्रसाद बाबानगरे, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.