२९ ऑक्टोबरला महाबळेश्वर भिलार येथे
डिजिटल मिडियाचे पहिले अधिवेशन!
नमस्कार,
नव्या जमान्याचे लोकप्रिय माध्यम ठरलेल्या डिजिटल मिडियात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला सकारात्मक दिशा देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी महाबळेश्वर भिलार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी मोठ्या उत्साहात सुरु केली आहे.
++++++++++++++
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर(भिलार) येथे २९ ऑक्टोबर २०२२ रोजी होत असून या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री शंभूराजे देसाई तर कार्याध्यक्ष माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील हे आहेत.
++++++++++++++
या अधिवेशनाचे संयोजकपद संघटनेच्या सातारा जिल्हा शाखेने स्वीकारले असून महाबळेश्वर अधिवेशनाच्या नियोजनाची बैठक काल सातारा शासकीय विश्रामगृहात सातारा जिल्हाध्यक्ष विकास भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे, पश्चिम महाराष्ट्र सहसचिव सचिन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संजय कदम ,तुषार तपासे ,ओंकार कदम, संतोष नलवडे, नितीन ढापरे, प्रमोद तोडकर, संतोष शिराळे ,बापूसाहेब वाघ, राहुल ताटे -पाटील ,स्वप्नील गव्हाळे ,मृणाल देवकुळे, महेश चव्हाण, संजय कारंडे, मदन जांभळे, गणेश बोतालजी , नवनाथ पवार, सुहास कांबळे ,अमोल टकले, सागर दंडवते, सोहेल मुलाणी, सूर्यप्रताप कांबळे, प्रशांत बाजी, संदीप, दीक्षित, प्रकाश वायदंडे, ललित लोखंडे, जावेद खान ,सुनील रणदिवे, सोमनाथ साखरे हे सभासद उपस्थित होते.
अधिवेशन यशस्वितेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
राजा माने,
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.