शिवसेनेशी बंड केल्यानंतर काल मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली मात्र संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना आज संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नव्या सरकारला शुभेच्छा देताना ‘नवा संसार सुखाने करा’ असे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना म्हटले आहे.
प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, ‘सोईनुसार राजकारण झाले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा ! नवा संसार सुखाने करा. याशिवाय आम्ही सरकार मध्ये अडथळे निर्मण करणार नसल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हंटले आहे. ‘जीथे ठाकरे तिथे शिवसेना असणार आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्याने फडणवीस नाराज आहेत का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांशी बोलल्याशिवाय ते कळणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊत आज ईडी च्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. ट्विट करीत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘आज मी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो. तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. काळजी करू नका’ अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.