Latest Marathi News

BREAKING NEWS

‘धर्मवीर’ स्टाईलने प्रसाद ओकने दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छा

0

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली, तसेच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. गुरुवारी संध्याकाळी ७:३० च्या सुमारास राजभवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वांनीच कौतुकाचा वर्षाव केला.

धर्मवीर फेम अभिनेता प्रसाद ओकने देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये प्रसादाने धर्मवीर चित्रपटाच्या प्रमोशनमधील आनंद दिघे यांच्या गेटअपमध्ये असलेला एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये एकनाथ शिंदे हे मंदिरात देवाला हात जोडताना दिसत आहेत.

प्रसादाच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा आहे. तसेच या पोस्टमध्ये प्रसादने मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना कोटी कोटी शुभेच्छा असे कॅप्शन देखील दिले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच शिंदे यांच्यावर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. तसेच सोशल मीडियावरून देखील शिंदे यांचे अनेकांनी अभिनंदन केल्याचे पाहायला मिळाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.