Latest Marathi News

BREAKING NEWS

‘मविआ’ माध्यमातून निवडणुका लढवण्याचा निर्णय अद्याप नाही – शरद पवार

0

 

राज्यात सत्तानाट्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार आणि १२ अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीची साथ सोडल्याने ठाकरे सरकार धोक्यात आले. सरकार अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपा-शिंदे गटाने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला.

राज्यातील राजकारणात घडलेल्या या घडामोडीमुळे आगामी काळात महाविकास आघाडीचं काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी माध्यमांत याबाबत मोठे विधान केले. शरद पवार म्हणाले की, आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही असं विधान केल्यानं मविआच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दिल्लीहून सूचना आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सरकारबद्दल लोकांना विश्वास वाटायला हवा. ज्याप्रकारे शिंदे-फडणवीस सरकार आले त्यामुळे अनेकांना अपेक्षित नव्हतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सगळ्यांना वाटत होते. धक्कातंत्र भाजपाने अवलंबलं आहे असं पवारांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.