Latest Marathi News

BREAKING NEWS

एकनाथ शिंदे डी.लिट पदवीने सन्मानित; राज्यापाल बैस यांनी केलं कौतुक

0

शिवसेना पक्ष फोडून ४० आमदारांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षसबोट युती करून सरकार स्थापन करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आता त्यांना मनाची पदवी मनाली जाणारी डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. मंगळवारी राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत त्यांना ही मानाची पदवी बहाल करण्यात आली आहे. यावे बोलताना राज्यपाल म्हणाले की, आपल्या देशाला तक्षशिला, नालंदा, सोमपुरा यांसारख्या जागतिक दर्जाच्या समृद्ध विद्यापीठांचा इतिहास आहे. हा वारसा आताच्या विद्यापीठांनी पुढे न्यायला हवा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी नेरूळ येथे केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल, तर लाेकमत मीडियाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांना समाजसेवा, माध्यमक्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती विजय पाटील यांच्या हस्ते राज्यपालांच्या उपस्थितीत डी. लिट या मानद उपाधीने गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांनी मुख्यमंंत्री शिंदे आणि दर्डा यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगून दोघांचे डी. लिट पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील, कुलगुरू डॉ. वंदन मिश्रा-चतुर्वेदी, डॉ. नंदिता पालशेतकर, प्र-कुलगुरू शिवानी पाटील यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख सर्वश्री डॉ. गौरांग मिस्त्री, महेश कुमार हरत, एन. डी. पाटील, देवयानी गुप्ता, वाणी कामत आदी उपस्थित होते. प्रत्येक जण पदवी घेतल्यानंतर नव्या आयुष्यात पाऊल ठेवतात. यानंतर आलेले दायित्व यशस्वीपणे निभावण्याची महत्त्वाची जबाबदारी असते. ती आज पदवी मिळालेले सर्व विद्यार्थी पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करून राज्यपाल बैस यांनी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने शिक्षणच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.