बार्शी |
लायन्स क्लब बार्शी टाऊन, लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनी, व माधवबाग आयुर्वेद कार्डीयाक क्लिनिक, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी मध्ये जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून वॉकेथॉन (३ की. मी. चालण्याची स्पर्धा ) आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दि. सात एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सुरु होईल. याचे सहभाग शुल्क फक्त ५० रुपये ठेवण्यात आले आहे. प्रत्येक स्पर्धकास ई सर्टिफिकेट व मेडल मिळणार आहे व प्रथम ५०० स्पर्धकास टी शर्ट मिळणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार रोज चालण्याने मधुमेह नियंत्रित राहू शकतो. हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते. मानसिक आरोग्य व्यवस्थित राहते. यामुळेच या वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेसाठी लायन्स क्लब बार्शी टाऊन चे अध्यक्ष अमित कटारिया, सचिव आदित्य कोठारी, प्रकल्पप्रमुख अमित इंगोले, राजाभाऊ काळे, हेमंत जमदाडे, रणजितसिंह शेळके हे उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या होणाऱ्या वॉकेथॉन स्पर्धेत सर्व बार्शी करांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन प्रकल्प प्रमुख अमित इंगोले यांनी केले आहे. रजिस्ट्रेशन ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. रजिस्ट्रेशन ३१ मार्च पर्यंत करणाऱ्या पहिल्या ५०० स्पर्धकास टी शर्ट मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्यावे, असे लायन्स क्लब बार्शी टाऊन तर्फे सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक साई डेव्हलपर्स, बार्शी आणि सह प्रायोजक विकास गुगळे ज्वेलर्स हे आहेत.
ऑफलाईन रजिस्ट्रेशनसाठी
१) महावीर क्रीएशन, पटेल चौक पार्श्वनाथ मार्ग, बार्शी
२) कोठारी लॅबोरेटरी, शिवाजी नगर, बार्शी