Latest Marathi News

BREAKING NEWS

‘एकनाथ शिंदेंनी पाचोऱ्यातून निवडणूक जिंकून दाखवली तर बापाचं नाव लावणार नाही’

0

 

”ज्यांना प्रसाद ओक आणि आनंद दिघे यांच्यातील फरक ओळखता येत नाही, ते आज हिंदुत्वाचे धडे देत आहेत. काकांची पुण्याई आणि शिवसेनेच्या विचारावर जे पुढे आले ते आता एकनाथ शिंदे यांना बाप म्हणत आहेत, हे दुर्दैव! त्याच किशोर पाटील यांच्या ऐवजी पाचोर्‍यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभे रहावे. आम्ही त्यांना पाडल्याशिवाय राहणार नाही!

एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवली तरी इथे शिवसैनिकच विजयी होईल आणि असं झालं नाही तर बापाचं नाव लावणार नाही”, अशा शब्दांमध्ये शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी घणाघाती टीका केली. पाचोरा येथील पक्षाच्या मेळाव्यात सावंत यांनी आपल्या शब्दबाणांनी शिंदे, त्यांचे सहकारी आणि विशेषतः आमदार किशोर पाटील यांना सोलून काढले.

पाचोरा तालुक्यातील मोठ्या संख्येने शिवसैनिक या मेळाव्याप्रसंगी उपस्थित होते. पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे शिवसेनेचा हा मेळावा पार पडला. यावेळी संजय सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटात सहभागी झालेल्या बंडखोर आमदारांवरही सडकून टीका केली. जे सोडून गेले ते कावळे आणि जे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते शिवरायांचे खरे मावळे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.