Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते

0

 

मुंबई – रामदास आठवले हे आपल्या विधानामुळे आणि कवितेमुळे नेहमी चर्चेत असतात. त्याचबरोबर ते त्यांच्या शैलीत इतर नेत्यांवरती टीका देखील करतात. राज्यातल्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात सरकार नवं स्थापन झाल्यानंतर त्याला कुठेतरी पुर्णविराम मिळेल अशी शक्यता होती. परंतु राजकीय घडामोडी काही थांबलेल्या नाहीत.

महाराष्ट्रातले सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रोज नव्याने नवे आरोप केले जात आहेत. आता रामदास आठवले यांनी संजय राऊत यांनी शिवसेना फोडली असल्याचा आरोप त्यांच्यावरती केला आहे. संजय राऊत यांना राष्ट्रवादीसोबत जायचं असल्याने त्यांनी भाजप शिवसेनेची युती तोडली असं वक्तव्य आठवले यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी गडबड केली नसती तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापण झालं नसतं. तसेच भाजप शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात आलं असतं.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पक्षात फूट पडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीशी युती केली आहे. शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा देखील आठवले यांनी राऊत यांच्यावरती आरोप केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली नसती तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकारं आलं असतं असं देखील ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.