Latest Marathi News

BREAKING NEWS

  देशाचे १५ वे राष्ट्रपती कोण?; आज होणार फैसला 

0

 

 

नवी दिल्ली | देशाचे पुढील राष्ट्रपतींचे नाव काही तासांत निवडणूक आयोगासमोर येईल. देशभरातून आणलेल्या मतपेट्यांची मोजणी आज सकाळी ११ वाजता संसद भवनात सुरू होईल. देशाचे १५ वे राष्ट्रपती आज देशाला मिळतील. द्रौपदी मुर्मू या सत्ताधारी एनडीएच्या उमेदवार असून त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. पदभार स्वीकारताच त्या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती बनतील. विरोधकांनी मुर्मू यांच्यासमोर यशवंत सिन्हा यांना उभे केले आहे.

 

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा २५ जुलै रोजी होणार आहे. संसदेत ९८.९% मतदान झाले- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी ९८.९० टक्के मतदारांनी संसद भवनात मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक अधिकारी पी.सी. मोदींनी सदरील माहिती दिली.

 

आयोगाने ७२७ खासदार आणि ९ आमदारांसह एकूण ७३६ मतदारांना संसद भवनात मतदान करण्याची परवानगी दिली होती. त्यापैकी ७१९ खासदार आणि ९ आमदारांसह ७२८ जणांनी मतदान केले. दरम्यान देशभरातील राज्यांच्या विधानसभांमध्येही मतदान झाले. विविध राजकीय पक्षांची भूमिका लक्षात घेता या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.