Latest Marathi News

BREAKING NEWS

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अमृता फडणवीसांची ट्विट करून उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

0

 

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षविरोधात बंड पुकारले असून त्यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, तसेच ठाण्यातील खास पदाधिकारीही सूरतला गेले असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेसह राज्याच्या राजकारण मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया उमटल्या. यातच आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय असतात. राज्यातील राजकीय घडामोडींवरही त्या सडेतोडपणे भाष्य करत असतात. राज्यसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतरही अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ट्विट करत महाविकास आघाडीवर टीका केली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या घडामोडींनंतर पुन्हा एका अमृता फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांनी, एक ‘था’ कपटी राजा .. असे ट्विट करत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर सूचक शब्दांत टीका केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, काही वेळात हे ट्विट डिलिट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे भाजपची आणि एकनाथ शिंदेंची चर्चा नाही, कुठलीही पूर्व योजना नाही, एकनाथ शिंदे यांनी वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला, त्याचे पुढे काय होईल?, हे सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही, आम्ही त्यांना प्रस्ताव दिला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.