मुंबई : महाराष्ट्रचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यामधील वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहे. घरची धुणी मी बाहेर धूत नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंना लगावला होता. यावर माझ्याकडे अनेक फोटोज आणि व्हीडिओज आहेत तुमच्यासारखे उघडे नागडे धंदे मी केले नाहीत असा गौप्यस्पोट एकनाथ खडसेंनी केला होता.
दरम्यान एकनाथ खडसे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यात ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासंबंधी बोलत होते. या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, वाय. बी. चव्हाण सेंटरमधून कामाला सुरुवात करत असतात. आज एकनाथ खडसे त्यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्त करण्यात आली असून. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांची वरणी लागणार असल्यास सन्मानास्पद पद मिळण्याविषयी चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे.
मी लपून छापून कोणत्याही गोष्टी करत नाही जे करायाचं आहे ते उघड करेन. अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. शरद पवार नेहमीप्रमाणे वाय बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले असून, एकनाथ खडसे शरद पवारांची भेट घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.