आयोध्या : अयोध्येत भूमिपूजन झाल्यापासून, राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यापासून मोठ्या संख्येने भाविक श्रद्धेनुसार रामलल्लाच्या चरणी वेगवेगळ्या गोष्टी अर्पण करीत आहेत. आतापर्यंत मंदिर बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांची देणगी देण्यात आली आहे.
बुधवारी तामिळनाडूमधील रामेश्वरमपासून 4500 कि.मी. प्रवास करून मागवण्यात आलेली 613 किलोची घंटा रामलल्लाच्या चरणी भेट म्हणून देण्यात आली. या घंटेची खास गोष्ट म्हणजे त्याचा आवाज बर्यामच किलोमीटरपर्यंत ऐकला जातो. लीगल राइट काउंसिल ने ही घंटा भेट दिली आहे.
खरं तर, रामेश्वरममधून 17 सप्टेंबरला निघालेली राम रथ यात्रा 21 दिवसांत 10 राज्यांतून बुधवारी अयोध्येत पोहोचली. या प्रवासामध्ये एकूण 18 लोक सामील झाले होते. श्री रामजन्मभूमी मठात पूजन केल्यानंतर तामिळनाडूच्या महिला राजलक्ष्मी मांडा यांनी राम मंदिर ट्रस्टला घंटा भेट दिली. यावेळी खासदार, आमदार, महापौर आणि श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यावेळी उपस्थित होते.