Latest Marathi News

BREAKING NEWS

ईदच्या शुभेच्छा देताना नाशिकमध्ये झळकले गुलशनाबादचे पोस्टर !

0

नाशिक | राज्यात लव्ह जिहाद आणि औरंगजेबाच्या स्टेटसवरून गदारोळ निर्माण झालेला असताना आता नाशकातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात गुलशनाबाद नावाचे फलक झळकले आहे. बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर नाशिक ऐवजी शहराचा गुलशनाबाद असा उल्लेख करण्यात आला आहे.

मुघलकाळात नाशिकचं नाव गुलशनाबाद असं होतं. मात्र पेशवाईच्या काळात गुलशनाबादचं नामकरण नाशिक असं करण्यात आलं. या पोस्टरमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून या नामकरणाचा पोस्टरनंतर हिंदुत्वादी संघटना संताप व्यक्त करत आहेत. तसेच दुसरीकडे बॅनर लावणाऱ्यांवर कारवाईची सुद्धा मागणी करण्यात येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार काल सर्वत्र बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परंतु नाशिकमध्ये बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवर नाशिक ऐवजी गुलशनाबाद असा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुघल काळात नाशिकचं नाव गुलशनाबाद असं होतं. मात्र त्यानंतर गुलशनाबादचं नामांतर नाशिक असं करण्यात आलं.

Leave A Reply

Your email address will not be published.