Latest Marathi News

BREAKING NEWS

दूध संघ निवडणुकीत खोक्यांचा वापर केला जाईल, एकनाथ खडसेंचा आरोप

0

जळगाव जिल्हा दूध संघात निवडणुकीत सत्तेचा वापर करत विरोधकांकडून खोक्याचा वापर होईल, धनाचा वापर होईल, विरोधकांवर आता आम्हाला बोलायचं नाही किंवा त्यांना उत्तर पण द्यायच नाही. ते मतदानाच्या आणि निकालाच्या दिवशी दिसेलच असं म्हणत एकनाथ खडसेंनी (विरोधकांवर टीका केली आहे. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना लोक खोक्यांच्या विषयाला कंटाळले आहेत, पण यांचे ते तीन लोक जेलमध्ये आहेत, ते काय पारितोषिक विजेते आहेत का? असा सवाल उपस्थित करत खडसेंना जोरदार टोला लगावला आहे.

जिल्हा दूध संघातील नोकर भरती प्रकरणातील गैरव्यवहाराच्या अनेक ऑडिओ क्लिप माझ्याकडे असल्याचं सांगत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना इशारा दिला होता. यावरून एकनाथ खडसे यांनी ऑडिओ क्लिप किंवा काही पुरावे आहेत तर निवडणुकीत लोकांच्या समोर मांडायला हवे होते, असं त्यांनी म्हटलं. माझ्या विरोधातील व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग असेल तर त्याचा निवडणुकीत वापर करणार कर ना… असा एकेरी उल्लेख करत एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना उत्तर दिले आहे.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत मतदार हे सुज्ञ असून विकासाच्या बाजूने आहेत. विकास काम ज्यांनी केले..त्यांच्यावर मतदार शिक्कामोर्तब करणार असल्याचं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मतदार हे विकासाच्या बाजूच्या बाजूने असल्याचं मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं होतं. त्यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा दूध संघ प्रकरणी दाखल करण्यात तीन जण जेलमध्ये आहेत हाच का त्यांचा विकास असं म्हणत एकनाथ खडसेंना उपरोधक टोला लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.