Latest Marathi News

BREAKING NEWS

महाविकास आघाडीच्या बिघाडीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांची खंत

0

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादावरून राजकारण चांगलंच तापलं असून दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळतय. या सर्व पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या खासदारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होती. या बैठकीला सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाच्या खासदारांना देखील सोबत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुप्रिया सुळे यांच्या या निर्णयाला ठाकरे गटाच्या खासदारांनी विरोधत केला. अखेर शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना अमित शाह यांच्या दालनाबाहेरच थांबावे लागले.

यावरून आता राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. नेमकं काय म्हटल आव्हाड यांनी? सुप्रिया सुळे यांना ठाकरे गटाच्या खासदारांनी विरोध केल्यानंतर यावरून जितेंद्र आव्हाड यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्राच्या मातीतून 48 खासदार लोकसभेत गेले आहेत.

आजवर जेव्हा-जेव्हा महाराष्ट्राच्या मातीचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा-तेव्हा या 48 खासदारांनी पक्षभिनिवेश विसरून एकत्र यावं ही सगळ्या मराठी जनांची इच्छा आहे. हे त्यांच्या मनात आहे. पण, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लोकांना कर्नाटक सरकारने त्रास दिल्यानंतर आणि बोम्मईंच्या आक्षेपार्ह वर्तनानंतर महाराष्ट्राच्या मातीची ती एकी दिसली नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. हा विखुरलेला महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी छत्रपती शिवराय बघत असतील तर काय विचार करीत असतील? ‘अस ट्विट आव्हाड यांनी केलं आहे

Leave A Reply

Your email address will not be published.