Latest Marathi News

BREAKING NEWS

२५ लाखाच्या खंडणी प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचा हा माजी नगरसेवक फरार

0

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख योगेश भोईर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून ते या प्रकरणात फरार झाले आहेत. गुन्हे शाखेकडून त्यांचा शोध सुरू आहे. एस. डी कॉर्पकडून त्यांनी 25 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ते फरार असून, आता गुन्हे शाखेकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

एसडी कॉर्पकडे 25 लाखांच्या खंडणीची मागणी घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्यावर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस. डी. कॉर्पकडे 25 लाखांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर योगेश भोईर हे फरार झाले आहेत. त्यांचा गुन्हे शाखेकडून शोध सुरू आहे.

एकाला अटक दरम्यान या प्रकरणात भीमसेन यादव या आरोपीला अटक करण्यात आली आहे. योगेश भोईर हे या खंडणी प्रकरणात सह आरोपी आहेत. भीमसेन यादव याला 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर फरार योगेश भोईर यांचा शोध सुरू आहे. याप्राणात अद्याप उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने प्रतिक्रिया दिली नसून यावर काय बोलतात हे पहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.