पुणे |
दिवाळी आठ दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यानिमित्त प्रत्येक राजकीय कार्यकर्ता सामाजिक भान ठेवून वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करत असतो. त्याच पार्श्वभूमीवर पुणे येथील बाणेर येथे चंद्रकांत दादांच्या हस्ते नागरिकाला सरंजामचे वाटप करण्यात आले, यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांची दिवाळी गोड व्हावी यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून बाणेर मधील नागरिकांना सरंजाम वाटप केले. या कार्यक्रमावेळी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवेजी , आ. मेघना बोर्डीकर, चित्राताई वाघ, जगदीश मुळीक, राजेश पांडे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, आनंद भरोसे, राहुल कोकाटे, सनी निम्हण यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.