Latest Marathi News

BREAKING NEWS

शिंदे गटाच्या ढाल तलवार चिन्हावर मोठा आक्षेप, रद्द करण्याची मागणी

0

मुंबई |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल आणि तलवार चिन्ह मिळालं आहे. पण आता नांदेडमध्ये बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या चिन्हावर आक्षेप घेण्यात आला आहे. ढाल तलवार ही धार्मिक निशाणी असून त्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी सचखंड गुरुद्वाराच्या माजी सदस्याने घेतली.

शिंदे गटाची निशाणी ढाल तलवारवर नांदेड मधील सचखंड गुरुद्वारा च्या माजी सदस्याने आक्षेप घेतला आहे. ढाल तलवार ही धार्मिक निशाणी असल्याचा दावा करत हा आक्षेप घेण्यात आला आहे. ‘ढाल तलवार ही शिखांची धार्मिक निशाणी आहे. श्री गुरु गोविंदसिंग यांनी जेव्हा खालसा धर्माची स्थापना केली त्यावेळी ढाल तलवार रक्षणासाठी अर्पण केली होती. शिखांच्या पाचही तखतांवर रोज ढाल तलवारी हे पूजन केले जाते. त्यामुळे हे निवडणूक चिन्ह देऊ नये अशा आशयाचा आक्षेप गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार रणजितसिंग कामठेकर यांनी घेतलाय.

निवडणूक आयोगाने याबद्दल निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा, जर न्याय दिला नाहीतर संविधानाप्रमाणे न्यायालयीन लढा दिला जाईल, असा इशाराही रणजितसिंग यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.