पुणे |
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते भिक्षेकर्यांना दिवाळी फराळाची वाटप करण्यात आली, दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र शासन ‘आनंदाचा शिधा’ या उपक्रमांतर्गत ही शंभर रुपयांमध्ये दिवाळी किट देत आहे, याशिवाय आपापल्या परीने प्रत्येक जण दिवाळीच्या फराळाचे वाटप करत आहे.
प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी यासाठी भाजपा सेवा प्रकोष्ठचे शेखर मुंदडा यांच्या माध्यमातून ‘महा एनजीओ’ फेडरेशनकडून ‘क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत भिक्षेकऱ्यांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. यावेळी सेवा प्रकोष्ठचे पदाधिकारी, महा एनजीओ आणि क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्वयंसेवक उपस्थित होते.