Latest Marathi News

BREAKING NEWS

“पुण्याला स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे” – चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे |

‘स्वच्छ पुणे’साठी ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर’तर्फे आयोजित पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी चर्चासत्रात सहभाग घेऊन, पुण्यातील स्वच्छता संदर्भातील विविध विषयांवर भूमिका मांडली.

पुण्याचे उद्योग हे संशोधन आणि उत्पादनात पुढे आहेत. स्वच्छतेबाबतही उपयुक्त संशोधन करीत नवे उपक्रम राबविण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे आणि पुण्याला स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मराठा चेंबरचे अध्यक्ष डॉ.सुधीर मेहता, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.