Latest Marathi News

BREAKING NEWS

दिवाळीचा फराळ चक्क परदेशात विकून कोट्याधीश झालेल्या ‘या’ मराठी माणसाची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

0

मुंबई |

दिवाळीचा फराळ विकून कोट्याधीश झालेल्या बऱ्याच लोकांबद्दल आपल्याला ऐकायला मिळत असते. असेच एक कुटुंब आहे ते म्हणजे गोडबोले कुटुंब. गोडबोलेंच्या फराळाला थेट परदेशातून मागणी असते.

आता तर गोडबोलेंच्या दिवाळीच्या फराळाची उलाढाल कोटींच्या घरात आहे. वाचून आश्चर्य वाटेल पण एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नवरा हा सगळा कोट्यावधींचा व्याप सांभाळतो. ही अभिनेत्री म्हणजे किशोरी गोडबोले. अभिनेत्री किशोरी गोडबोले चा नवरा सचिन गोडबोलें चे दादरमध्ये खास मराठी घरगुती खाद्य पदार्थाचे अर्थात फराळाचे दुकान आहे. सचिन गोडबोले यांच्या आई सुमती गोडबोले यांनी अगदी पाच पदार्थ विकून हा व्यवसाय उभा केला होता. त्यांचा मुलगा सचिन हा जपानमधील एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. पण वडिलांच्या निधनानंतर आईने त्याला नोकरी सोडून त्यांचा व्यवसाय सांभाळायला सांगितले आणि मुलाने आईच्या या शब्दा खातर उच्च पदाची नोकरी सोडली.

Leave A Reply

Your email address will not be published.