मुंबई : जेंव्हा कोणी आपल्यातून निघून जातं तेंव्हाच त्याची किमंत कळते हे काही खोटं नाही. सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर कित्येक लोकांना धक्का बसला. असा तरुण अभिनेता सर्वकाही असताना आत्महत्या कशी करतो यावर कोणाचाही विश्वास बसेना.
पुढे पुढे लोकांच्या समोर आलेल्या गोष्टींवरून असे समजले की सुशांत सिंह राजपूत नेपोटीझमचा शिकार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याविषयी लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. लाखो लोकांनी करण जोहर, सलमान खान, आलिया भट, सोनम कपूर यांना अनफॉलो केले.
अशातच सुशांतच्या कारकिर्दीतील शेवटच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाचे नाव ‘दिल बेचारा’ असे आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला एकाच दिवसात 3.8 मिलियन पेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. आत्तापर्यंत जगात सगळ्यात जास्त लाईक असणारा ट्रेलर हा ‘अव्हेंजर इन्फिनिटी वॉर’चा होता, ज्याला 3.6 मिलियन लाईक्स होत्या. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की इन्फिनिटी वॉर च्या ट्रेलरला 238 मिलियन व्ह्यूज मिळाल्यानंतर इतक्या लाईक्स आल्या होत्या पण सुशांतच्या दिल बेचाराला आत्तापर्यंत 12 मिलियन व्ह्यूज आहेत. त्यामुळे हा सिनेमा अजून कोणते रेकॉर्ड बनवेल याचा आपण अंदाज न लावलेलाच बरा.
दरम्यान लोकांची सुशांतबद्दलची भावना यातून प्रकट होत आहे सुशांतच्या आयुष्यातला हा शेवटचा सिनेमा आहे जो 24 जुलैला डीझनी हॉटस्टारवरती रिलीज होणार आहे.