लाडक्या बापाचं घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. सगळीकडे आनंदाचं, जल्लोषाचं वातावरण पहायला मिळत आहे.सगळ्याच क्षेत्रातील लोक बाप्पाच्या आगमनाचा आस्वाद घेत असून या धुमधडाक्यात, जल्लोषात सहभागी होत आहेत. सर्व कलाकार मंडळीही निरनिराळ्या गोष्टी करताना दिसत आहेत.
अशातच सर्वांचा लाडका ‘आपला सिद्धू’ म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधवनं गणपती स्पेशल ढोल-ताशाचा आनंद लुटलेला पहायला मिळाला. सिद्धार्थ जाधवनं इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या नव्या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय. सिद्धार्थनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो ढोल-ताशा वाजवताना दिसत आहे. शिवाय तो या संधीचा आनंदही लुटताना दिसत आहे.
कलावंत ढोल-ताशा पथकामध्ये सहभागी होऊन सिद्धार्थ बेधुंद झालेला पहायला मिळतोय. त्यानं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच अभिनयाबरोबर त्याच्या या कलेचं सुद्धा सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे.