Latest Marathi News

BREAKING NEWS

मिटकरींचे एका महिलेच्या प्रकरणातील व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा दावा

0

 

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर अकोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी अनेक आरोप लगावले आहे त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गद वाद चव्हाट्यावर आले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी प्रदेशाध्यक्षांसमोर आमदार मिटकरींवर कमिशनखोरीचे गंभीर आरोप केले होते. आता या आरोपांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यावर आमदार मिटकरींनी शिवा मोहोड यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

आमदार मिटकरींचं अकोला जिल्ह्यातील पातूरच्या एका महिलेचं प्रकरण निपटण्यात आलं. या प्रकरणात पाया पडणाऱ्या मिटकरींचे व्हिडीओ आपल्याकडे आहेत. आपल्यावर चारित्र्याचे आरोप करणाऱ्या मिटकरींनी त्याचे पुरावे द्यावेत. नाहीतर दहा दिवसांनंतर सर्व पुरावे आपण माध्यमांसमोर उघड करणार असल्याचं जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं आहे की, मिटकरींनी एका महिलेच्या संदर्भातील प्रकरण अकोल्यातील एका महिला पदाधिकाऱ्याला १० लाख रूपये देऊन निपटवले. मिटकरींनी तीन दिवस अकोल्याच्या विश्रामगृहावर ठेवलेली पुण्यातील पदाधिकारी कोण होती? असा सवालही त्यांनी केला आहे.मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप केल्यानंतर आज ‘माझा’कडे एक व्हॉट्सअॅप चॅटिंग उघड केलं. यात मिटकरींनी कमिशनचे 1 लाख परत केल्याचा दावा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.