Latest Marathi News

BREAKING NEWS

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर अमृता फडणवीस यांचं ट्वीट

0

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्ता स्थापन करतील हे स्पष्ट होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असल्याची घोषणा करत एकच खळबळ उडवून दिली.अनपेक्षितरित्या मुख्यमंत्रीपदाची माळ शिंदे यांच्या गळ्यात पडली आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या नावाचे स्मरण केले. शिंदे हे महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री ठरले.

दरम्यान, शिंदे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपण या मंत्रिमंडळात कोणतेही पद स्वीकारणार नाही असे फडणवीस यांनी याआधी सांगितले होते. मात्र केंद्रीय नेतृत्वाने आग्रह केल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. यातच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमधून नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिलं, “महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनःपूर्वक शुभेच्छा!” असे ट्विट अरुण नव्या शिंदे-फडणवीस सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी सुद्धा ठाकरे सरकारवर अमृता फडणवीस यांनी घणाघाती टीका केली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.