Latest Marathi News

BREAKING NEWS

धक्कादायक | बागेश्वर धाममधून ४ महिन्यांत २१ जण बेपत्ता

0

मध्यप्रदेश | सध्या संपूर्ण देशभरात बागेश्वर धामची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. देशासह संपूर्ण जगातील लोक आपली अर्जी लावण्यासाठी बागेश्वर धाम येथे येत असतात. आठवड्यातील मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी तर येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते. मात्र, गेल्या काही दिवसांत, येथे काहीतरी मागण्यासाठी येणारे काही लोकच बेपत्ता झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बागेश्वर धाममधून बेपत्ता झालेल्यांमध्ये काही लोक मानसिक दृष्टीने आजारी आहेत. तर काही गर्दीमुळे कुटुंबापासून वेगळे झले आहेत. यात इतर राज्यांतील लोकांचाही मावेश आहे.

आपल्या हरवलेल्या लोकांचा घेण्यासाठी देशाच्या इतर राज्यांतील लोकही पोलीस ठाण्याच्या आणि बागेश्वर धाम कार्यालयांच्या फेऱ्या मारत आहेत. गेल्या 1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत बागेश्वर धाम येथून 21 जण बेपत्ता झाले आहेत. यातील 9 जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तर 12 जण अद्यापही बेपत्ता असल्याचे समजते. अद्याप पोलीस या लोकांपर्यंत पोहोचू शकलले नाहीत. सध्या पोलीस यांचाशोध घेत आहे.

छत्रपूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी अमित सांघी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही बेपत्ता असलेल्या इतर 12 जणांपर्यंत पोलीस पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. संबंधित लोकांच्या कुटुंबीयांकडून तक्रार मिळाल्यानंतर, पोलिसांनी शोध सुरू केला आहे. तत्पूर्वी नागपूर येथे बागेश्वर धाम यांच्या माध्यमातून भरवण्यात आलेल्या दरबाराविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा शाम मानव यांनी तक्रार केली होती तसेच त्यांच्या चमत्काराला आवाहन दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.