Latest Marathi News

BREAKING NEWS

परिणीती-राघवचा १५० पाहुण्यांच्या उपस्थितीत नवी-दिल्लीत होणार साखरपुडा

0

मुंबई |

हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. पण त्या दोघांनीही अजून त्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. पण आता त्यांच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच त्यांचा साखरपुडा होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा येत्या शनिवारी नवी दिल्लीत साखरपुडा होणार असल्याचं बोललं जात आहे. त्या दोघांच्या साखरपुड्याला फक्त १५० मंडळी हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण परिणीती चोप्रा किंवा राघव चड्ढा यांच्याकडून साखरपुड्याच्या बातमीला दुजोरा मिळालेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.