Latest Marathi News

BREAKING NEWS

आज सोनिया गांधींची ईडी चौकशी; काँग्रेस नेत्यांची मुंबईसह देशभरात निदर्शनं

0

नवी दिल्ली | नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लॉन्ड्रींगची चौकशी करणाऱ्या ईडीनं आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. सोनिया गांधी आज ईडी समोर हजर होणार आहेत. तर ईडी विरोधात काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. सकाळी 11 वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयावर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला जाणार आहे.

केंद्र सरकार विरोधात आज काँग्रेसचे नेते मुंबईच्या ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. सकाळी 11 वाजता जीपोओ चौकातून निघणाऱ्या मोर्चात नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, चरणसिंह सप्रा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसकडून ईडीविरोधात आंदोलनं केली जाणार आहेत.

यापूर्वी जूनमध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची ईडी चौकशी झाली होती. त्यावेळीही ईडीविरोधात काँग्रेसनं देशभरात एल्गार पुकारला होता. यावेळी काँग्रेसनं दिल्लीत जबरदस्त निदर्शनं करत मोदी सरकारवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप केला होता आणि गांधी कुटुंबावरील मनी लाँड्रिंगचे आरोप निराधार असल्याचं म्हटलं होतं. गुरुवारी, काँग्रेस खासदार संसदेच्या आत आणि बाहेर आंदोलन करतील, तर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते अकबर रोडवरील मुख्यालयात जमतील आणि ईडी कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.