Latest Marathi News

BREAKING NEWS

दादा भुसे, सुहास कांदे यांना पर्याय शोधा ! उद्धव ठाकरे यांचे आदेश

0

 

शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहे अशातच उद्धव ठाकरे यांचा बैठकांचा सपाटा सुरुच आहे.
शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे हे बैठका घेत आहेत. त्यांनी पक्ष बांधणीवर जोर दिला आहे. आता तर नाशिक जिल्ह्यात दादा भुसे आणि सुहास कांदे यांना पर्याय शोधा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना दिले आहेत. राज्यात एकीकडे सत्तापालट होऊन भाजपाच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी झालेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

नव्या सरकारकडून निर्णयांचा आढावा आणि नवे निर्णय घेतले जात असताना उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पक्ष बांधणीवर जोरदार भर देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे पुढचं पाऊल काय असणार? याविषयी मोठी चर्चा सुरु होती. या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी तेव्हाच आपण पुढे काय करणार याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार ते शिवसेना भवनात पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्रातील परिस्थितीचा ते आढावा घेत पक्ष संघटना बांधणीवर लक्ष देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.